संस्कार बालक मंदिर, सिंदखेड राजा येथे गणेशोत्सवानिमित्त ‘गणपती चित्र रंगवणे स्पर्धा’ उत्साहात संपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा:येथील स्थानिक संस्कार बालक मंदिर मध्ये श्री गणेशोत्सवानिमित्त लहान विद्यार्थ्यांसाठी ‘गणपती चित्र रंगवणे’ स्पर्धेचे खास आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील सर्व बालगोपाळांनी अत्यंत उत्साहाने भाग घेत आपल्या कल्पकतेने गणपतीची चित्रे रंगवली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी अप्रतिम व उत्कृष्ट पद्धतीने चित्रे रंगवल्याने परीक्षकांसमोर विजेते निवडणे कठीण झाले होते. मुलांच्या या कौतुकास्पद कलेचा आणि उत्साहाचा गौरव करण्यासाठी शाळेच्या वतीने सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
डॉ. सौ. वर्षा मुरकुट यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असतात, असे मनोगत डॉ. सौ. वर्षा मुरकुट यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या संचालिका सौ. कुलकर्णी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि उज्ज्वल भविष्याचे कौतुक केले. कार्यक्रमाला शिक्षक वृंद, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



