तेल्हारा तालुक्यातील वाडी आदमपूर चे सरपंच रुपेश वल्लभदासजी राठी यांची राष्ट्रीय सरपंच संघ च्या राष्ट्रीय महासंघटक पदी नियुक्ति !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
वाडी अदमपूर दि. १ जुलै ;
रुपेश वल्लभदासजी राठी सरपंच ग्राम पंचायत वाडी अदमपूर , जाफ्रापूर तथा तालुका अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांची राष्ट्रीय सरपंच संघच्या राष्ट्रीय महासंघटक पदी नियुक्ति नुकतीच दिल्ली येथे झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सरपंच संघच्या अधिवेशनात करण्यात आली.
अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष महासचिव यांच्या सर्वानुमते सरपंच रुपेश राठी यांची राष्ट्रीय महासंघटक पदी नियुक्ति करण्यात आली आहे. ग्रामीण भागामधे जास्तीत जास्त विकास व या संघटनेमुळे सर्व देशभरात पंचायत राज बळकटीकरण हे या राष्ट्रीय सरपंच संघ संघटनेचे उद्दिष्ट आहे. तसेच सरपंचांच्या अधिकारांमध्ये वाढ करून गावचा विकास चांगल्या प्रकारे कसा करता येईल आदि विषयावर चर्चा यावेळी करण्यात आली.
सरपंच रुपेश राठी यांनी आपल्या नियुक्ती चे श्रेय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पुरषोत्तम पाटील घोगरे व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सर्व सहकारी , गावकरी मंडळीं यांना दिले.
सरपंच रुपेश राठी यांची राष्ट्रीय सरपंच संघ च्या राष्ट्रीय महासंघटक पदी नियुक्ती झाल्याची वार्ता कळताच सर्वच स्तरावरून सरपंच रुपेश राठी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



