मुबई

तर हे घडलं नसत .

….तर हे घडलं नसत .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर कळवा रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्ण दगावल्यावरून विरोधकांनी सत्ताधारी सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आत येण्याचे सगळे दरवाजे उघडे आहेत पण जाण्यासाठी फक्त वरचा दरवाजा उघडा आहे. श्रीराम जयराम. या प्रकाराची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा २ दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. माळगावकर स्वभावाला चांगला माणूस आहे. पण डोकं नसलेला माणूस आहे. ज्यांचं इथे काम नाही, त्यांनाच इथे आणून ठेवलं आहे. या मृत्यूंना सर्वस्वी महापालिकाच जबाबदार आहे. १७ मृत्यूंची जबाबदारी कुणीतरी स्वीकारावी लागेल. हे ठाणेकरांना न शोभणारं आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस गरीब घरातला असतो. वाडा, मोखाडा, पालघरमधून आदिवासी लोक येतात उपचारांसाठी. त्यांचं जेवणही हे प्रशासन खातं. खायला दोन अंडी दिली पाहिजेत. प्रोटीन्स दिले पाहिजेत. वाडग्यात भात आणि डाळ देतात खायला”, असा आरोप त्यांनी.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button