बुलढाणामहाराष्ट्र

तथागत भाई अंभोरे यांचा प्रशासनाला इशारा; १६ जूनला BSNL टॉवरवर चढून आंदोलनाची घोषणा…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

.!*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद *संग्रामपूर:-* १२ जून २०२६15 जूनपर्यंत दखल न घेतल्यास 16 जूनपासून तीव्र आंदोलनाचा इशारासंग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य गावामध्ये अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली पाण्याची टाकी सध्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून ती गावकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात समाजभूषण तथा समाजसेवक तथागत भाई अंभोरे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, सदर पाण्याच्या टाकीला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून तिची रचना कमकुवत झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी टाकी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही टाकी गावातील नागरिकांच्या घरांजवळ व वस्तीच्या परिसरात असल्याने दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून ही टाकी पाडण्याची किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी तथागत भाई अंभोरे यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, भविष्यात या जीर्ण टाकीमुळे कोणतीही दुर्घटना, जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. दरम्यान, 15 जूनपर्यंत या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोरील BSNL मोबाईल टॉवरवर चढून 16 जून रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर किती वेगाने आणि प्रभावीपणे कारवाई करते, याकडे दुर्गादैत्य ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.जीर्ण टाकीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दुर्घटना होण्यापूर्वीच उपाययोजना करण्याची मागणी.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button