शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन इमारतीचे उद्घाटन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती स्वारस्य अभियोक्ती योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात नवीन कार्यालयीन इमारतीसह २६ व्यापारी,कमर्शियल गाळ्यांचा बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम ह भ प तुकाराम महाराज सखारामपुर यांचे शुभ हस्ते व श्री पांडुरंगदादा पाटील, सहकार नेते श्री ज्ञानेश्वरदादा पाटील, अध्यक्ष माऊली ग्रुप शेगाव श्री गोपाळराव मिरगे सभापती, रघुनाथ पाटील भांबेरे अध्यक्ष खरेदी विक्री संघ, सेवकरामजी ताथोड सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापुर, उपसभापती श्रीकांत तायडे, शेगाव बाजार समितीचे माजी सभापती गजाननराव भटकर, शेषराव पाटील पहुरकर, श्रीधर पाटील उन्हाळे, श्रीकृष्ण घुईकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न.
कार्यक्रमाला ह भ प तुकाराम महाराज, पांडुरंग दादा पाटील, ज्ञानेश्वर दादा पाटील, सभापती गोपाळराव मिरगे, बाळापूर बाजार समितीचे सभापती सेवकराम ताथोड यांनी संबोधित केले.
यावेळी बाजार समितीचे संचालक सर्वश्री श्रीधर पांडुरंग पाटील, तेजराव दळी, रमेश पाटील उमाळे दादाराव पाटील निळे, योगेश थारकर परमेश्वर हिंगणे, श्रीधर पुंडकर, संजय शेळके, संतोष भारसाकडे, वासुदेवराव धुमाळे, सुरेश उन्हाळे, अमोल लांजुडकर, संजय गव्हांदे, विठ्ठलदादा पाटील, रितेश टेकडीवाल, गुलाबखा भुरेखा, तसेच बाजार समितीचे सर्व कर्मचारी, अडते, व्यापारी, हमाल, मापारी तालुक्यातील शेतकरी व व्यावसायिक दुकानदार लोकांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन समितीचे सहाय्यक सचिव विनोद पूंडकर, प्रास्ताविक सचिव विलास पुंडकर, तसेच आभार प्रदर्शन सभापती गोपाळराव मिरगे यांनी केले.



