ग्रामसेवकांच्या हेकेखोर कारभाराला कंटाळून पंचायत समिती कार्यालयाला ठोकले कुलूप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
मलकापूर तालुक्यातील
दाताळा ग्राम पंचायतचा कारभार ग्रामसेवक अभाठी ठप्प झालेला आहे. ग्रामसेवकाची बदली होऊन पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु तेथील ग्रामसेवक सुधीर ढोले हे पदभार सोडण्यास तयार नाही. त्यामुळे आम पंचायतीची कामे ठप्प झाली आहेत. तसेच देवधाबा येथील ग्रामसेवक दिपक ठाकूर यांचाही असाच प्रताप असल्याने तालुक्यात ग्रामसेवक संघटनेची पदे घेवून गावांना वेठीस धरणाऱ्या या दोघांचीही तालुक्या बाहेर जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकून आमचे ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा भाजपा नेते शिवचंद्र तायडे यांनी दिला आज ८ जानेवारी रोजी तालुक्यातील दाताळा येथील ग्रामसेवक सुधीर ढोले व देवधाबा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक दिपक ठाकूर यांच्या हेकेखोर कारभारा विरोधात व त्यांच्या कार्यशैलीला त्रस्त होऊन सरपंच, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ यांनी कृउबास सभापती तथा भाजपा नेते शिवचंद्र तायडे यांना आपली
गहाणी सांगितली. यावेळी शिवचंद्र तायडे यांनी
थेट पंचायत समिती कार्यर्यालय गाठून पंचायत समितीच्या विभागांना तसेच गटविकास अधिकान्यांच्या दालनाला ताले ठोकले. तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, या दोन्ही गावांमध्ये
शासनाच्या
योजनांचा जसे घरकुल, संडास यासह आदी योजनांचा लाभ देतांना हेतुपुरस्सर पात्र लाभार्थ्यांना डावलण्याचा प्रकार होत असून घरकुलाचे धनादेश तसेच शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण हे दोन्ही ग्रामसेठक करीत असल्याचा आरोप यावेळी तायडे यांनी केला. त्याचप्रमाणे दाताळा येथील ग्रामसेवक सुधीर ढोले यांची बदली होऊन
देखील ते आपला पदभार सोडत नाहीत. त्यांना
वेळोवेळी म्हटले असता ते हेकेखोरपणे उत्तर
देऊन सांगतात की माझे ग्राम पंचायतीच्या कामांमध्ये बरेच पैसे अडकलेले आहेत, ते पैसे निघाल्याशिवाय मी कोणालाही चार्ज देणार नाही. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी संघटनेच्या नावावर व आपल्याकडे असलेल्या संघटनेचा पदाचा दुरूपयोग करणे सुरू केले 311 हो त्याचप्रमाणे दाताळा ग्राम पंचायत बाबत ग्राम विकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आदेश दिल्या नंतरही पं. स. च्या वतीने ग्रामसेवकाला चार्ज दिला गेला नसून खाते बदलही केला नसल्याने ग्रामविकास मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तेव्हा अशा दोन्ही ग्रामसेवकांना जोपर्यंत तालुक्याच्या बाहेर बदली देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समिती कार्यर्यालयातून जाणार नाही असा इशारा यावेळी शिवचंद्र तायडे यांनी दिला. तर दाताळा सरपंच सौ. विद्याताई
हरीभाऊ दशमुख यांनी सांगितले की, ग्रामसेवक
ढोले हे आमच्या ग्राम पंचायतीला ग्रामसेवकाची नियुक्ती झाली असतांनाही त्यांना चार्ज देत नाहीत. त्यामुळे ग्राम पंचायतीची अनेक कामे खोळंबली आहेत. तसेच ग्राम पंचायतीमध्ये पाण्याचा प्रश्न, वीजेचा प्रश्न यासह आदी मुलभूत सुविधा पुरविण्यास आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत.
तेव्हा यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृउबास संचालक संजय काजळे पाटील, हरीभाऊ देशमुख, देवधाबा सरपंच देवसिंग सोळके, ग्रा. पं. सदस्य सुवर्णी ढगे, विनोद गोरोडे, विनायक सपकाळ, गोपाल गुरचळ, कुंदन मंडवाले, मोरखेड सरपंच पराग नापडे, उपसरपंच गिताबाई जंगले, ग्रा. पं. सदस्य दुर्गाबाई तांगडे, योगेश चोपडे, संजय बंड यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



