सेठ बन्सीधर झुनझुनवाला व स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन , आर्थिक दुर्बल गरजु महिलांना केले शिलाई मशीनचे वाटप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.
तेल्हारा दि.०८: तेल्हारा शहरातील नामांकित सेठ बन्सीधर दहिगांवकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ कनिष्ठ महाविद्यालय येथे सेठ बन्सीधर झुनझुनवाला व स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उत्साहात साजरे करण्यात आले. यादरम्यान ज्ञानपीठामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धांचे क्रीडा प्रकारांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे ,पान व पुष्परचना पोस्टर बनवणे ,विज्ञान प्रदर्शनी व ऐतिहासिक प्रतिकृतींचे प्रदर्शनी ,रांगोळी ,बिस्कीट सजावट ,मटकी व पूजा थाली डेकोरेशन ,यांचे व ज्ञानपीठाच्या क्रीडांगणाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी माननीय श्री गोपालदासजी मल्ल ,अध्यक्ष सेठ बन्सीधर दहिगांवकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले व श्री विलासराव जोशी उपाध्यक्ष सेठ बन्सीधर हायस्कूल दहिगांवकर एज्युकेशन सोसायटी व अध्यक्ष स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व कनिष्ठ महाविद्यालय,श्री विठ्ठलराव र. खारोडे व्यवस्थापक,श्री अभिजीत शाह कोषाध्यक्ष, श्री राजेंद्रजी शाह सदस्य, श्री बेनीप्रसाद देवीलालजी झुनझुनूवाला सदस्य, अश्विनीताई खारोडे सदस्य, श्री विष्णूभाऊ मल्ल सदस्य, डॉ. विक्रम जोशी सदस्य, श्री ओमप्रकाश झुनझुनवाला सर्वसाधारण सदस्य व श्री रमेशचंद्रजी पाडिया सदस्य तसेच मुख्याध्यापिका सौ रंजना भागवत मॅडम व उपमुख्याध्यापिका सुईवाल मॅडम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. से.ब.झुनझुनवाला व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या औचित्याने आर्थिक व दुर्बल घटकांतील काहि महिलांना शिलाई मशीन सुद्धा वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर शालेय परिपाठ,परेड प्रात्यक्षिकाद्वारे व्यासपीठाला मानवंदना देण्यात आली ,लेझीम पथकाद्वारे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तसेच लाठी काठी ,शिवकालीन मर्दानी खेळांचे कौशल्य, सादरीकरण झाले तसेच डंबेल्स सादरीकरण, अरेबिक डान्स व समूहगीत सादर करण्यात आले व कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मिठाई चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानपीठाच्या प्राचार्या सौ भागवत मॅडम यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन कु. दिपाली फोकमारे व प्रियंका मथारिया यांनी केले तर उत्कृष्ट आभार प्रदर्शन कु.प्रणिता सदाफळे यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.✍️



