अपघातनिधन

झाडातून गेलेल्या विद्युत वाहिनेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी,

रतन भगत,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी.

              सविस्तर वृत्त असे की ,आज दिनांक 15/ 9 /2025 रोज सोमवारला शेगाव ते वरवट बकाल रोडवरील कडेच्या  बाजूला असलेल्या एका झाडाच्या मधून मेन विद्युत तार गेलेला आहे,आणि याच झाडावर एक बाजूच्याच असलेल्या पाथरगाव पिपरी येथील इसम हा बकऱ्यांना खाण्यासाठी पाला तोडायला झाडावर चढलाआणि त्या झाडातून गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे काथरगाव पिपरी येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला ,तर दुसरा गंभीर स्वरूपाचा जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे मेन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेले आहे.अशी माहिती मिळालेली आहे.मृतक व जखमी हे दोन्ही युवक काथरगाव येथील रहिवासी असूनसदर घटना आज 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी वरवट बकाल ते शेगाव या रोडवर घडली.या दुर्दैवी घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी महावितरण विरोधामध्ये रोष व्यक्त करीत रास्ता रोको केला होता.

          या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील तीन ते चार युवक वरवट ते शेगाव या मेन रोडवर नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास बकऱ्या चारत होते.यावेळी काथरगाव येथील दोन युवक  बकऱ्यांना खाण्याचा पाला तोडण्यासाठी कळंब या झाडावर चढले होते.यावेळी झाडातून गेलेल्या 133 केव्ही मुख्य विद्युत वाहिनीच्या वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने योगेश देवकुळे वय 26 वर्ष हा युवक झाडावरून खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला,तर दुसरा  आदित्य सुनील सरदार हा गंभीर स्वरूपाचा जखमी झाला.ही माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असता,या ठिकाणी ग्रामस्थांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवले.यावेळी वरवट बकाल येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून योगेश देवकुळे यांना मृत घोषित केले.तर दुसरा आदित्य सुनील सरदार याच्यावर  प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी शेगाव येथून अकोला येथे घालवण्यात आले आहे अशी माहिती मिळाली आहे.

       या गंभीर दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत वरवट बकाल ते शेगाव या मेन रोडवर काथरगाव येथील लोकनियुक्त सरपंच पती तथा काँग्रेस पक्षाचे नेते गणेश टापरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.जोपर्यंत मृतकाच्या कुटुंबाला महावितरण विभागाकडून तात्काळ आर्थिक मदत दिली जात नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेतल्या जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती .परंतु तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून संतप्त ग्रामस्थांची समजूत घातली .त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून दिली. वृत्त युवकाच्या पश्चात पत्नी की जी सध्या गर्भवती आहे, आणि दोन लहान मुलं वडील असा अपत्य परिवार आहे .योगेशच्या अचनाक निधनामुळे काथरगाव या गावात शोकपणा पसरली आहे महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचे ग्रामस्थांकडून बोलल्या जात आहे .यादरम्यान महावितरण कडून शेगाव येथील महावितरणाचे सहाय्यक अभियंता यांनी मृतकाची पत्नी निकिता योगेश देवकुळे यांना लेखी आश्वासन दिले. त्यामध्ये नमूद केले आहे की आज तात्काळ स्वरूपात वीस हजार रुपयाची मदत देण्यात येत आहे .तर विद्युत निरीक्षक व शवविच्छेदन अहवालानंतर एकूण चार लाखाची मदत शासन नियमानुसार चौकशी आणती देण्यात येईल, तसेच जखमी आदित्य सुनील सरदार यांनासुद्धा उपचाराकरता वीस हजार रुपये देण्यात आलेले आहे तसेच शासन नियमाप्रमाणे मदत दिली जाईल असे दिलेल्या पत्रकामध्ये नमूद केले आहे.

✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button