Uncategorized

अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यास पकडले

अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यास पकडले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

दि.28/06/2023 पोलीस स्टेशन शेगाव शहर येथील पो ना गजानन बाबुलाल गिते ब.नं. 653, सोबत जाधव ब.न. 2397 असे शेगाव शहरात मोटार सायकलने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन इसम छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडुन अग्रेसन चौकाकडे त्याचे ताब्यातील मोटार सायकलवर बॉक्स मध्ये विदेशी दारुच्या शिश्या घेवून जात आहेत. अशा माहीती प्रमाणे त्या दारूविक्रेत्या आरोपितांना रात्री 10/00 वा. सुमारास नाकाबंदी करून अग्रेसन चौकात पकडले त्यांचे कब्जातून पृष्ठाचे 3 बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये KINGFISHER STRONG PREMIUM BEER कंपनीच्या प्रत्येकी 650 ML मापाची कंपनी सिलबंद प्रत्येकी कि. 185/- रुपये प्रमाणे 36 नग शिश्या असा एकुण किंमती 6660/-रुपयाचा प्रोव्ही मुद्देमाल मिळुन आला. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता 1) अमोल रामजी पुरोहीत वय 32 वर्ष रा. इंदीरानगर, शेगांव ता. जि. बुलढाणा 2) प्रशांत प्रकाशराव पांडे वय 44 वर्ष रा. चाळीसगांव जि. जळगांव खान्देश ह. मु. धनगरनगर, शेगांव असे सांगितले. त्यांना दारू कब्जात बाळगुण त्याची वाहतूक करणे बाबतचा परवाना विचारला असता त्यांनी कुठलाही परवाना नसल्याचे पंचासमोर सांगितले वरून शेगाव शहर पोलिसांद्वारे त्याचेविरुद्ध कलम 65 (अ) (ई), म.दा.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button