बुलढाणामहाराष्ट्र

जि.प. केंद्रीय प्रा.शाळा पिंपळगाव काळे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी,

स्टार भारत लाईव्ह

प्रतिनिधी :-प्रशांत चव्हाण

बुलढाणा :- (दि २७ जुलै) जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, पिंपळगाव काळे येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून विठ्ठलाच्या नामस्मरणात सहभागी होत दिंडी काढली. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी अभंग, भजन तसेच विठ्ठल भक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या माता-पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पालकांनी विद्यार्थ्यांसोबत नामस्मरण, भजन आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यामुळे शाळेचे वातावरण अधिक भक्तिमय आणि आनंदमय झाले.
आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि संतपरंपरेबद्दल आदरभाव निर्माण झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button