इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,

स्टार भारत लाईव्ह
प्रतिनिधी -: प्रशांत चव्हाण
बुलढाणा :- (दि.२७ जुलै)जिल्हा परिषद केंद्र शाळा, पिंपळगाव काळे येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत सुपेश ढोले, विक्रांत बुंदे, आणि प्रेमनाथ बहादरे , या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द, नियमित अभ्यास तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद केंद्र शाळा पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.



