बुलढाणामहाराष्ट्र

झाडावर वीज पडून ४० पोपटांचा मृत्यू

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) जलंब येथील रेल्वे स्टेशन परिसरातील पिंपळाच्या झाडावर वीज पडल्यामुळे ४० पोपटांचा मृत्यू झाला. ही घटना ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.जलंब येथे शुक्रवारी रात्री विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडला. यामध्ये जलंब येथील रहिवासी प्रमोद गव्हांदे यांच्या घराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडावर वीज पडल्यामुळे पिंपळावर असलेल्या ४० पोपटांचा खाली पडून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या त्या ४० पोपटांचा झाडाखाली सडा पडलेला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी त्या मृत्युमुखी पडलेल्या पोपटांना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. परिसरात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button