खानदेशजळगावा जिल्हासामाजिक

जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सहस्त्रलिंग ता रावेर येथे ” परिवर्तनाच्या वाटेवर ” या उपक्रमा अंतर्गत बारावे वाटसरू श्री निलेश चौधरी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद ….

रावेर प्रतिनिधी

जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सहस्त्रलिंग ता रावेर येथे ” परिवर्तनाच्या वाटेवर ” या उपक्रमा अंतर्गत बारावे वाटसरू श्री निलेश चौधरी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद …..सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले नंतर श्री निलेश चौधरी व श्री अशोक चौधरी यांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री युनूस तडवी यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन केले. उपस्थितांना प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. श्री निलेश चौधरी सरांनी विद्यार्थ्यांना एम टी एस, स्कॉलरशीप, नवोदय इत्यादी परीक्षांचा परिचय करून दिला व परिसरावर आधारित सोपे प्रश्न विचारत विद्यार्थ्यांना बोलतं केलं व योग्य उत्तर देणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना पेन बक्षिस दिले. दररोज थोडा का होईना परंतू अभ्यास केला पाहिजे व वाचनाचाही सराव केला पाहीजे हे सांगितले. तदनंतर श्री अशोक चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी म्हणून २० गुणांची परीक्षा घेण्यात आली. व ४ विजेत्या विद्यार्थ्यांना पॅड , शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.प्रथम क्रमांक नताशा युनूस तडवी ४ थी २०/२० गुणव्दितिय क्रमांक अलिम कबीर तडवी ५ वी १८/२० गुणतृतीय क्रमांक समीरा भिका तडवी ४ थी १७/२० गुणप्रोत्साहनपर वसिम इरफान तडवी ६ वी २०/२० गुण या आठवड्याचा ” साप्ताहीक अभ्यास विजेता ” म्हणून दानिश करीम तडवी इयत्ता तिसरी यास बक्षिस देण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे श्री अशोक चौधरी व श्री निलेश चौधरी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी विविध शाळांना भेटी देतात व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व अभ्यासात गोडी निर्माण व्हावी म्हणून विविध उपक्रम राबवितात. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख होण्यास मदत झाली. गावात नुकतेच सुरु करण्यात आलेल्या वाचनालयातील विद्यार्थ्यांनाही या प्रसंगी दोन्ही मान्यवरांनी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले . आजच्या कार्यक्रमासाठी आवश्यक फलकलेखन श्री नईम तडवी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास सुरवाडे सरांनी केले व आभार शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री आसिफ तडवी यांनी मानले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button