बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी मौजे जांभोरा येथील शेतशिवाराला भेट देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली

पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : देऊळगाव राजा तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी तहसील कार्यालयात विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

बैठकीत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्या-वस्त्या, विहिरी व इतर जलस्रोतांची स्थिती, टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता, चारा व पशुधनाची उपलब्धता तसेच कृषी पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांची नियमित पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होईल, यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पाणीटंचाईग्रस्त भागात परिस्थितीनुसार तातडीच्या उपाययोजना करता याव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी. नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचण निर्माण होणार नाही, यासाठी स्थानिक प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

तसेच तालुक्यातील चारा, पशुधन आणि कृषी पिकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ हाती घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी मौजे जांभोरा येथील शेतशिवाराला भेट देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता, पावसाची स्थिती तसेच पिकांवर झालेल्या परिणामाबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, गटविकास अधिकारी, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल मंडळ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button