जळगावा जिल्हाबुलढाणाभुसावळमहाराष्ट्रयावलरावेरविदर्भ

सातबाऱ्यावर कुपनलिकेची नोंद करण्यासाठी ₹१ हजारांची लाच; आमोदा तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; तलाठी शैलेश झोटे यांना रंगेहात पकडले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

यावल : सातबारा उताऱ्यावर कुपनलिकेची नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ हजार रुपये स्वीकारताना आमोदा येथील तलाठी शैलेश झोटे यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने मंगळवारी रंगेहात पकडल्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

सातबारा नोंदीसाठी मागितली लाच

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर कुपनलिकेची नोंद करण्यासाठी तलाठी शैलेश झोटे यांनी लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार आमोदा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या तलाठी कार्यालयाजवळ पोहोचला. यावेळी तडजोडीअंती ठरलेली १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने तलाठी झोटे यांना ताब्यात घेतले.

जळगाव एसीबीची कारवाई

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व सहकाऱ्यांनी केली. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

लाच मागणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन महाराष्ट्र एसीबीकडूनही करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button