जळगावा जिल्हारावेर

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त रावेर पोलीस ठाण्यात डॉक्टरांचा सन्मान; आरोग्यसेवकांना कृतज्ञतेची मानवंदना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

रावेर पोलीस स्टेशनमध्ये जागतिक डॉक्टर दिन उत्साहात; शहरातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव

रावेर | प्रतिनिधी. विकास आमोदकर

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त रावेर पोलीस स्टेशन येथे शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आरोग्यसेवा बजावणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. एस. आर. पाटील, डॉ. अनंत अकोले, माऊली हॉस्पिटलचे डॉ. संदीप पाटील, ओम सर्जिकल हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद वानखेडे, जानकी हॉस्पिटलचे डॉ. दिगंबर पाटील, श्रीपाद हॉस्पिटलचे डॉ. योगेश पाटील, सुश्रुत हॉस्पिटलचे डॉ. योगेश महाजन, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. राहुल अहिरराव, रावेर एक्स-रे सेंटरचे डॉ. ताराचंद सावळे तसेच डॉ. निलेश चौधरी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान केला. यावेळी त्यांनी डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देत समाजाच्या आरोग्यसेवेत डॉक्टरांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या सेवेमुळे नागरिकांना नवजीवन मिळत असल्याचे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी मानले. कार्यक्रमास वैद्यकीय व पोलीस विभागातील मान्यवरांची उपस्थिती लाभली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button