खानदेशजळगावा जिल्हाराजकीय

जळगाव जिल्ह्याचे शिवसेनेचे(ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांच्याकडून माहिती अधिकार कार्यकर्ते यांना जीवे ठार मारण्याची धमकीअर्जदाराकडून ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव शिवसेनेचे(ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते यांना जीवे ठार मारण्याची धमकी

(जिल्हा प्रतिनिधी) जळगाव :-भुसावळ तालुक्यातील आचेगांव येथील जयराज बसराज पवार (भिल) अनुसुचित जमाती मधील माहिती अधिकार कार्यकर्ता यांना दि.३० रोजी माहिती अधिकार अंतर्गत वरणगांव येथील गंगाधर सांडु चौधरी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा शिवसेना ठाकरे गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाधान धर्मा महाजन यांची माहिती अधिकार अधिनियम नुसार शैक्षणिक पात्रतेची व तासीका संबंधित माहिती मागितली असता महाजन यांनी अर्जदाराला देशमुख पेट्रोल पंप वरणगाव जवळ चहाच्या दुकानावर बसले असता जिवे ठार मारण्याची धमकी देत दिली व माहिती अधिकार अर्जाची सत्यप्रत हातातून हिसकावून घेत परत तु जर अर्ज केला तर तुझी माझ्याशी गाठ आहे,लक्षात ठेव अशी धमकी दिली अशी तक्रार आपले सरकार पोर्टल व मुख्यमंत्री, राज्यपाल,जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना ईमेल द्वारे व मेसेजद्वारे तक्रार दाखल तक्रारदार अनुसुचित जमातीचा असल्याने संबंधित समाधान महाजन विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया
अर्जदार व तक्रारदार माझे मित्र असून मी त्यांच्या हातातून माहिती अधिकार अर्जाची सत्यप्रत घेतली असून मी त्यांना कोणतीही धमकी दिली नाही फक्त समजूत घालत माझी वैयक्तिक माहिती मागू नका असे बोलणे झाले व माझ्या सोबत माझे मित्र पत्रकार पाचपोळ होते व तक्रारदार यांच्या सोबत दोन मित्र त्याठिकाणी उपस्थित होते व त्यातील एक माझा कार्यकर्ता सोबत होता,अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button