जल जीवन मिशन योजनेचे कामास सुरूवात होऊन काम झाले नाही ; ग्रामस्थांची मोठी नाराजी

राहुरी शहर ( दत्ता जोगदंड ) :- राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या ताहाराबाद ,गाडकवाडी येथे ग्रामस्थांना अनेक दिवसांपासुन पाण्याची जास्त मोठी प्रतिक्षा असलेल्या जल जीवन मिशन योजना गरज आहे त्या शासनाने निधी दिला आहे . त्याचे उद्घघाटन होऊ ही प्रत्यक्ष करून ही कामास सुरुवात होत नसल्याने ताहाराबाद ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .
ताहाराबाद हे सुमारे लोकसंख्या ३२२० असलेले गाव आहे विशेष म्हणजे या ठिकाणी संत कवी महिपती महाराज यांचे मोठे देवस्थान आहे दर्शना साठी दुर दुर वरून भावीक भक्त येतात असतात या ठिकाणी माध्यमिक शाळा , जिल्हा परिषद शाळा यांना नेहमीच पाण्याची तीवृता भासत असते या गावाला १९ गाव
पाणी पुरवठा योजना चालू आहे ते पाणी साडवण करण्यासाठी जागा नसल्यामुळे टाकी पण नाही त्या मुळे नदी वरून पाणी येते प्रत्येकाच्या घरात जाते लाईट नसल्यावर पाणी येणे पण बंद होते ते नाही आले तर ग्रामस्था पाण्यापासुन वंचीत राहवे लागते आहे . या साठी सन २०२३ मध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातुन गावासाठी १ कोटी ५८ लक्ष रुपयाचा खर्चासाठी निधी आला आहे त्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती त्यासाठी ताहाराबाद ग्रामपंचायत समितेचे ग्रामसेवक शिवाजी पटेकर सरपंच निवृत्ती विठ्ठल धनदान यांची प्रशासक म्हणून नियुक्त केली होती तर ठेकेदार म्हणून नवनाथ ढेकणे हे होते पण ही योजना कडे ग्रामसेवक व सरपंच यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे ही योजना आज ही बंद आहे ही कधी चालू होईल या पासून ग्रामस्था प्यायची पाणी भेटेल का नाही ही प्रश्न निर्माण झाला आहे . हे या गावला प्यायच्या पाण्याची काही गरज नाही असे वागत आहे बेलकर वाडी फाटा या ठिकाणी प्यायच्या पाण्याचे टाकीचे १ वर्षे पासून दाखवण्यापुरतं काम सूरू आहे ताहाराबाद येथील जल जीवन विभागची तयार झालेली टाकी नाही तर गाडकवाडी या ठिकाणी टाकी नाही यामुळे प्यायच्या पाण्यापासुन वंचीत राहवे लागते आहे साठवण करण्यासाठी टाकी असली तरच सर्वसामान्य जनतेला पाणी भेटू शकते .या योजने मध्ये पाईप कधी १६० एम १४० एम ११० एम ९० एम पाईप त्या काही ठिकाणी एवढे छोटे पाईपची गरज नव्हती त्या ठिकाणी वापर करण्यात आला आहे पाईप लाईन आपल्या ठिकाणी त्याची खोदायचे काम ही खुप कमी झाले आहे पण याकडे ग्रामसेवक व सरपंच यांनी पाहणीच सुद्धा केली नाही ग्रामसेवका दुसऱ्या गांवी राहत असल्यामुळे त्यांनी ताहाराबाद येथील ठिकाणी न राहता दुसऱ्या ठिकाणी राहात आहे त्यामुळे त्यांनी जलजीवन योजनेकडे पाठ फिरवतात आहे कुठलीही दखल घेत नाही यामुळे ग्रामस्थ नाराज झाले आहे . या योजने पासून गाडकवाडी या ही ठिकाणी या योजनेचा वापर होणार का नाही परंतु त्याही ठिकाणी पाण्यासाठी पाणी भेटेल का नाही हा एक प्रश्न अनुत्तीर्ण आहे तर त्या ग्रामस्थाना पाणी भेटेल नाही तर त्यांना ही प्यायच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे नाही तर त्यांना वंचित राहावे लागणार आहे . या साठी तर ग्रामसेवक व सरपंच यांनी लक्ष देणे अपेक्षित होते ग्रामस्थची पाण्यासाठी घरपट्टी पाणीपट्टी इतर भरुण पण पाणी भेटत नाही ही पट्टी कशासाठी आहे .
[जलजीवन पाईप लाईनचे काम सुरू झाले ते अतिश निकृष्ठ चालू होते ते खुप खोली कमी होती त्यामुळे ते काम बंद केले … जलिंदर मुढे ताहाराबाद सदस्य ग्रामस्थ ]
[ राहुरी चे गट विकास अधिकारी यांनी शुक्रवारी व बुधवार दोन वेळ ताहाराबाद ग्रामपंचायतचे कागद पत्र व कामे पाहण्यासाठी आले होते ते एक वेळ ग्रामसेवका शिवाजी पटेकर यांना महिती झाले असता त्यांनी लगेच त्या ठिकाणाहून पळ काढला गेले तर ग्रामसेवक दुसऱ्यांदा हजर झाले नाही ]



