बुलढाणामहाराष्ट्र

जलंब स्टेशनवर रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा : मंगला घोपे

जलंब स्टेशनवर रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा : मंगला घोपे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकरजलंब, : येथील जलंब जंक्शन रेल्वे स्टेशनवर इंग्रज काळापासून थांबा असलेल्या सर्व एक्सप्रेस गाड्या या कोरोना काळापासून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदर बंद केलेल्या सर्व सुपरफास्ट गाड्यांचा असलेला थांबा पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी जलंब येथील ग्रा.प सरपंच मंगला उत्तम घोपे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे (ता. १५) मुंबई येथे मंत्रालयांमध्ये एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात नमूद आहे की, भुसावळ डिव्हिजनमध्ये असलेले जलंब जंक्शन रेल्वे स्टेशन हे विदर्भातील इंग्रज काळापासून पहिले रेल्वे स्टेशन असून, या रेल्वे स्टेशनवर सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा थांबावा सुरू होता परंतु रेल्वे प्रशासनाने कोविड १९ च्या वाढत्या प्रदूर्भावामुळे २३ मार्च २०२० पासून जवळपास३ वर्षापासूनकोरोनाच्यानावाखाली येथील रेल्वे स्टेशन वरील थांबा हा बंद केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब, प्रवाशांचे, शालेय विद्यार्थ्याचे प्रचंड हाल होत आहेतमंगला घोपे सर्व गाड्यांचायेथील रेल्वे स्टेशनला जवळपास ४० छोटे मोठे गावे लागून आहेत. परंतू सर्व गाड्यांचे थांबे बंद झाल्यामुळे या गावातील रुग्णांना मुंबई, जळगाव, नागपूर, अकोला येथे रुग्णांना उपचाराला जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व रेल्वे गाड्या पुन्हा पूर्ववत सुरू करून सर्वच गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button