बुलढाणा

जन सुरक्षा कायदा रद्द करा….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद

नुकत्याच महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने नव्याने मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायदा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेच्या हक्क हिरावून जन माणसांवर विविध प्रकारचे अनाधिकृत निर्बंध लादणारा असल्याने हा जनसुरक्षा कायदा रद्द करणेबाबत निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य सरकार नव्याने लागू केलेला जन सुरक्षा कायदा हा जन सुरक्षेच्या नावाखाली सर्व सामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनाधिकृत निर्बंध घालणारा हा कायदा अत्यंत चुकीचा आहे. जर एखाधा सरकारमधील मंत्री, आमदार, किंवा शासकीय अधिकारी यांच्या चुकीच्या प्रकाराबाबत व कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असेल किंवा तक्रार करत असेल तर हे कृत्य राष्ट्रहिता विरोधी कृत्य ठरवून यावर अनाधिकृत रित्या कारवाई करण्याचा अधिकार सरकार या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून स्वतःकडे राखून ठेवत आहे ऐक प्रकारे सरकार या कायद्यामुळे जनसामान्यांची व लोकशाहीच्या माध्यमांची मुस्कटदाबी करीत आहे. सत्ताधाऱ्यांचे चुकीच्या धोरणांचे सत्य जगासमोर आणण्यापासून सर्व सामान्य जनतेला रोखण्याचे या सरकारचे मनमानी धोरण आहे हे धोरण आम्हासह समस्त सर्व सामान्य जनतेला मान्य नसून या कायद्याला राज्यातील विविध संघटनांनी तसेच विरोधी पक्षातील विविध राजकीय पक्षांनी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र राज्यातील पदी अधिकाऱ्यांनी सुद्धा विरोध दर्शविला आहे. सरकारने तत्काळ हा कायदा रद्द करावा व सर्व सामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ हक्क त्यांना प्रदान करावा या मागणीसाठी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटी चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने अतिशय शांततेच्या मार्गाने निवेदन सादर करीत आहोत. आमच्या निवेदनाची दखल घेऊन तत्काळ हा जन सुरक्षा कायदा रद्द करावा. जर आपण हा जनसुरक्षा कायदा रद्द न केल्यास आम्ही यापुढे विविध प्रकारचे उग्र स्वरूपाचे आंदोलने करू यातून कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास याला महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकार व समस्त शासकीय अधिकारी पदाधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन मा उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे महामयम राज्यपाल यांना तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच दुसरे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पक्षनेते स्वातीताई वाकेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राम विजय भाऊ बुरुंगले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील माजी तालुकाध्यक्ष अविनाश भाऊ उमरकर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष एडवोकेट भालेराव शहराध्यक्ष अर्जुन भाऊ घोलप अजहर देशमुख एडवोकेट अमर पाचपोर एडवोकेट संदीप मानकर इंगळे डॉक्टर शाकीर खान ज्ञानेश्वर वानखडे अयाज भाई अब्दुल जाहीर शेख जुनेद प्रवीण भोपळे दिनेश काटकर अफरोझ भाई सुनील कळस्कर तौफिक भाई राजूव घुटे पांडुरंग भोपळे सुधाकर वानखडे अनिल इंगळे मारुती भाऊ सुरडकर प्रमोद तितरे अशोक साबे विजय भाऊ गुरव नितीन जाधव शंकर भाऊ मस्के आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button