बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
जनुना तलावची पाणी पातळी कमी असल्यामुळे मोठया मूर्ती विसर्जित होण्यास तांत्रिक अडचण?

श्रीं च्या मोठ्या मूर्ती विसर्जनाबाबत मंडळानी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा -मुख्याधिकारी
जी.डी.रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव -नगर परिषद खामगावच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जनुना तलाव येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जनुना तलावातील पाण्याची पातळी (गणेश विसर्जन घाट जवळील) सध्या 3 ते 3.5 फूट इतकीच आहे. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन तेथे करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. श्रींच्या मुर्तींची विटंबना होऊ नये. या करिता सर्व गणेश मंडळांना विनंती करण्यात येते की,
- मोठ्या मूर्तींसाठी कृपया पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा.
पर्यार्यी व्यवस्था – 1. बाळापूर 2. पुर्णा नदी ( येरळी, भास्तान ) 3. लोअर ज्ञानगंगा – वर्णा.
विसर्जन मिरवणूक वेळेत सुरु करून प्रशासनास सहकार्य करावे. तरी सर्व मंडळांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, ही विनंती.
मुख्याधिकारी
नगर परिषद, खामगाव



