सर्वेचे फार्स नको तर तातडीने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा : राहुलभाऊ बोंद्रे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
शेतकऱ्यांना जुनी-नवी कर्जमाफी, हेक्टरी अनुदानासाठी चिखली तालुका काँग्रेस आक्रमक
चिखली : जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगाम पूर्णपणे संकटात सापडला आहे. सोयाबीन, उडीद, मूग, तूर, कापूस, मिरची यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पिके अक्षरशः करपून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक उद्ध्वस्त होत असताना शासनाकडून केवळ सर्वेक्षणाचे फार्स सुरू ठेवणे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि शासनाच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. आता कागदी सर्वेक्षण नव्हे, तर प्रत्यक्ष मदत आणि ठोस शासननिर्णयाची गरज आहे. केवळ पंचनामे आणि सर्वेक्षणाच्या नावाखाली वेळकाढूपणा न करता चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना जुनी-नवी कर्जमाफी, हेक्टरी अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी आक्रमक मागणी लोकनेते माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केली.
गुरुवार 24 सप्टेंबर रोजी चिखली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचा जयस्तंभ चौक ते तहसील असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी चिखली तालुक्यात,बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे..सरकार सुकाळात अन् शेतकरी दुष्काळात..किसान के सन्मान में, काँग्रेस मैदान में, राहुल भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान चिखली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राहुलभाऊ बोंद्रे बोलत होते.
बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ९२ महसूल मंडळांमध्ये मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला आहे. जिल्ह्यात यंदा तब्बल ७ लाख २१ हजार ६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात आली आहे. मात्र पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे-खते आणि मजुरीचा बोजा शेतकऱ्यांवर असताना आता दुष्काळ पडल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचीही परिस्थिती राहिलेली नाही. शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे. सरकारने हा रोष समजून घेत तातडीने मदतीचा हात पुढे करावा, असे राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.
याप्रसंगी माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्यासह तालुका काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष रामभाउ जाधव, बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर, डाॅ. मोहमंद इसरार, माजी सभापती विष्णु पाटील कुळसुंदर, अशोकराव पडघान, जगन्नाथ पाटील, काषिनाथअप्पा बोंद्रे, कृषीमित्र सचिन बोंद्रे, कुणाल बोंद्रे,भाई प्रदीप अंभोरे, रिजवान सौदागर, धाड युवक ज्ञानेष्वर सुरूशे, प्रकाश निकाळजे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, चिखली तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष समाधान आकाळ, तालुका सेवादल अध्यक्ष रामभाउ भुसारी, तालुका पंचायत राज समिती अध्यक्ष गणेष जवंजाळ, विश्वदीप पडोळ, शिवराज पाटील, समाधान गिते, शेषराव पाटील आंभोरे, परमेष्वर साळवे, अंजाबराव देषमुख, नगरसेवक गोपाल देव्हडे, रत्नदिप शिनगारे, संतोष देशमुख, डाॅ. अमोल लहाने, गोकुळ शिगणे, प्रषांत भटकर, विजु पाटील शेजोळ, गाजी बाबा, पाषुसेठ, पुरूषोत्तम हेलगे, गणेश ठेंग, नासेर सौदागर, दिलीप पाटील, प्रदिप पचेरवाल,प्रभाकर वाघ, पंडितराव चाटे, आत्माराम देशमाने, वर्धमानसेठ डहाके, विजय पाटील शेजोळ, अंबादास खरात, दिलीप पाटील, अमिनखाॅ उस्मानखाॅ, मलीक जमदार, अज्जु खान, बिदुसिंग इंगळे, शेषराव आंभोरे, बाजीराव उन्हाळे, अशोक झगरे, डाॅ. संजय घुगे, संजय गिरी, हनुमान थोरात, हानिफ भाई, दिपक थोरात, याया खान, सौ.विद्याताई देषमाने, सौ. अनिताताई घुगे,श्रीमती प्रमिला ताई मधुकर जाधव हिरकणी महिला अर्बन संचालिका , जिल्हा महिला उपाध्यश महिला अध्यक्षसौ.विद्याताई देषमाने, सौ. अनिताताई घुगे, दत्तात्रय करवंदे, पुरूषोत्तम हाडे, पुरूषोत्तम हेलगे, बाळु साळोख, भारत खासभागे, नितीन वाघ, भास्कर चांदोरे, सुनिल करंडे, गजानन जाधव, गजानन डुकरे, सचिन बडगे, शौकत मन्यार, रोहन पाटील, सदुनाना ठेंग, दिपक हाके, प्रमोद महाले, विजय येवले, बाळु ढंगारी, रणजित झाल्टे, भास्कर चांदोरे, डाॅ. संजय घुगे, अनंतराव ठेंग, डिगांबर देशमाने, संतोष कोथलकर, नंदु अंभोरे, सदानंद धमक, अजिस भाई, बाबुराव सोनुने, संजय उंबरकर, दषरथ क्षिरसागर, महादु भालेराव, परमेष्वर साळवे, विðल सोनुने, भगवान गायकवाड, मलीक जमदार, बासिद जमदार, रामेष्वर देशमुख, सोनु देषमुख, संदिप सपकाळ, गजानन खंडारे, सदुनाना ठेंग, राहुल इंगळे, राहुल चवरे, भिकाभाउ शेटे, समाधान गिते, रफिक मेंबर, रमेश अंभोरे, अशोक खरात, पवन गवारे, श्रीराम जुमडे, बबलु शेख, रिजवान शेख, हरी जुमडे, असलम पठाण, सतिष काळे, नानाभाउ जुबंड, पवन पाटील, समाधान पंडागळे, राजेश मोरे, प्रकाष तायडे, लक्ष्मण भिसे, भिकाभाउ ठेंग, गजानन घायाळ, सरदारसिंग सोळंकी, निलेष आराख, शिवा म्हस्के, डिगांबर देषमाने, प्रदिप हाके, एन.टी.भुसारी, बंडु भुसारी, बंडु कदम, शकील खान, साहेबराव पाटील,विष्णु कुटे, समिर शेख,अश्विन जाधव, अब्रार बागवान, राहुल इंगळे, पिंटु वाघ, विकास आंभोरे, प्रकाश राठोड, समाधान पंडागळे, राजु वाघमारे, ज्ञानेष्वर वाघमारे, मनोहर सोळंकी, भारत पाटील, विठल ठेंग, गुलाबराव आंभोरे, सुर्दषन पवार, शेख सत्तार, राजु ठेंग, लक्ष्मण भुतेकर, प्रविण पाटील, रामकृष्ण कापसे, डिगांबर घायाळ, मनोज जाधव, मधुकर परीहार, एमनाथ सुसर, गणेषराव सुसर, प्रमोद सोळंकी, पवनसिंग इंगळे, शिवदास कापसे, प्रकाश चव्हाण, प्रकाश राठोड, कैलास कांडेलकर, दिलीप दहातोंडे, समाधान खरात, रफिक मेंबर, कुणाल देषमुख, विष्वनाथ ढंगारी, प्रभु लदड, ज्ञानेष्वर ढंगारी,ज्ञानेष्वर ढंगारी, विठलमामा झगरे, खुषालराव, देवेंद्र भुसारी, गजानन वांजोळ, कादरसेठ गादीवाले, बबन पानझाडे, शेख खैरू, पुरूषोत्तम शेळके, अकिल भाई, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या आहेत चिखली तालुका काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
शेतकऱ्यांना जुनी आणि नवी कर्जमाफी तात्काळ देण्यात यावी.
शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान वितरित करण्यात यावे.
शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा
आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.



