बुलढाणा

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये (SDPO) अर्जुन ठोसरे साहेबांच्या हस्ते श्री गणेशाची आरती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्री गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) अर्जुन ठोसरे साहेब यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत आरती करण्यात आली. या प्रसंगी संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने(एसडीपीओ) अर्जुन ठोसरे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून त्यांनी शाळेला भेट दिली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याबद्दल शाळा परिवाराच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
आरतीनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ठोसरे साहेब यांनी श्री गणेशाच्या बुद्धिमत्ता, संयम, शिस्त, परिश्रम, सकारात्मक विचार आणि संकटांवर मात करण्याच्या गुणांचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात हे गुण अंगीकारून शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी सातत्य, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेचे संस्थापक डॉ. रामप्रसाद शेळके, अध्यक्षा डॉ. मीनल शेळके, मुख्याध्यापिका डॉ. प्रियंका देशमुख , सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गणेशाच्या जयघोषाने आणि आरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक डॉ. रामप्रसाद शेळके यांनी ठोसरे साहेब यांचे शाळेला दिलेल्या भेटीबद्दल व विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार मानले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button