महाराष्ट्रविदर्भशेतीसामाजिक

एक वेळ अशी येईल की, लोकांकडे पैसे असतील पण बाजारात शेतीमालच उपलब्ध नसेल – कृषीमंत्री तोमर*

*एक वेळ अशी येईल की, लोकांकडे पैसे असतील पण बाजारात शेतीमालच उपलब्ध नसेल –

कृषीमंत्री तोमर*

जयपूर – शेती करणाऱ्या माणसांची संख्या कमी होत चालल्याने, काही दिवसांनी एकवेळ अशी येईल की लोकांकडे पैसे असतील पण खरेदी करण्यासाठी बाजारात कृषी उत्पादनेच नसतील असा इशारा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिला आहे.कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे त्या अनुषंगाने त्यांनी हे विधान केले आहे. तोमर हे चौधरी चरणसिंग राष्ट्रीय कृषी विपणन संस्था, जयपूर (राजस्थान) च्या चौथ्या दीक्षांत समारंभात संबोधित करत होते.ते म्हणाले की, आपल्या सर्वांना माहित आहे की, आपल्या देशासाठी कृषी क्षेत्र आवश्‍यक आहे. वाढलेले भौगोलिक क्षेत्र, विविध हवामानाचे क्षेत्र आणि शेतीवर अवलंबून असलेली वाढती लोकसंख्या आपल्यासाठी एक आव्हान आहे. शेती क्षेत्रातील लोकांची कमी झालेली आवड हे शेतीपुढील प्रमुख आव्हान आहे.पैसा मिळवण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध झाल्यामुळे शेतीशी निगडित लोक कमी झाले आहेत. त्यामुळे एक वेळ अशी येईल की लोकांच्या खिशात पैसे असतील पण खरेदी करण्यासाठी बाजारात शेतीमालच उपलब्ध नसेल.तोमर म्हणाले, शेतीविषयक आव्हानांवर मात करण्यासाठी, आम्ही अधिकाधिक लोकांना शेतीमध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न करीत आहोत. आम्ही खर्च कमी करण्याचा आणि शेतीमध्ये नफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज जगाला भारताकडून खूप अपेक्षा आहेत. अन्न, आणि औषधांसाठी निम्मे जग भारतावर अवलंबून आहे. उदरनिर्वाहासाठी नोकरी आवश्‍यक आहे, परंतु शेतीला योग्य स्थितीत आणणे ही देखील आपली जबाबदारी आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button