महाराष्ट्रविदर्भ

ग्रामीण भागातील रस्त्यांचे तीनतेरानाग ठाना ते जुमडा

वाशिम जिल्हा प्रतिनिधि

दुर्लक्ष आहे. परिणामी, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी वारंवार केल्यानंतरही पदाधिकारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना होतोय मनस्ताप वाशीम तालुक्यातील आडोळि खंडाळा टो, जुमडा अटकळी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक व विद्यार्थी, रुग्णांनासुध्दा चालणे कठीण झाले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनांच्या दुर्लक्षित कारभाराचे हे दिसते उदाहरण आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे होण्याअगोदर कामाचे कमिशन घेणारे अधिकारी व पदाधिकारी यांच्या या भ्रष्टवृत्तीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तर, स्थानिक पातळीवरसुद्धा पदाधिकारी या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी वरिष्ठ पदाधिकार्यांच्या म्हणन्यानुसार प्रत्येक विकासाच्या कामात राजकारण करीत असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांचे अवस्था खस्ताहाल झाली आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकारी व पदाधिकार्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाड़ी चे राम इढोळे व शीव संग्राम जिल्हा अध्यक्ष गजानन इढोळे यानी केली

सध्या पावसाचे दिवस आहेत. मात्र, तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नरक यातना भोगायला लागत आहेत. आडोळि खंडाळा टो, जुमडा, अटकळी या रस्ता गेल्या दोन तिन महाना पासुन खड्डेमय झाले आहेत. मात्र, या रस्त्यावर साधी डागडुजीसुध्दा करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी व विद्यार्थ्यांना गडे पाहात ये-जा करावी लागत आहे. या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र क्रांतिकारी आघाड़ी चे राम इढोळे व शीव संग्राम जिल्हा अध्यक्ष गजानन इढोळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाशीम तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असताना याकडे संबंधित विभागाच्या अधिकार्यांसह पदाधिकार्यांचे दुर लक्ष्य.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button