Uncategorized
जनतेचा विश्वास पक्ष सार्थ ठरवणार – डॉ केतकी ताई पाटील

मागील दशकात आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांसाठी केलेल्या कार्यामुळे पुन्हा एकदा जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवत मतदान केले आणि आज जळगाव आणि रावेर लोकसभेतून उभ्या दोन्ही उमेदवार निवडून आल्यात. त्याबद्दल आदरणीय स्मिताताई वाघ आणि रक्षाताई खडसे यांचे अभिनंदन.. जनतेने जो विश्वास दाखविला आहे त्याबद्दल आभार. कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत देखील वाखाण्याजोगी आहे. भाजपाने या दोन्ही मतदार संघात महिलांना संधी देऊन महिलांचा सन्मान केला आणि मतदारांनी या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करून सन्मानात वाढ केली. जनतेने पक्षावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरेल यात शंका नाही.
- डॉ केतकी ताई पाटील,
प्रदेश उपाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा


