चिमण्यांचे रक्षण होणे हे पर्यावरणासाठी आवश्यक

राजेंद्र मुंडे प्रतिनिधी.
जळगाव जामोद येथे आज दि. २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिनानिमित्त पर्यावरण मित्र जळगाव जामोद व वन विभाग जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षांसाठी पिण्याचे पाण्याचे पात्र वाटून जागतिक दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला शहरातील वनविभाग जळगाव जामोद येथे प्रांगणात तालुक्यातील पर्यावरण प्रेमी मित्र व वन विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेच्या वेळी व्यासपीठावर येथील नियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी श्री निलेश काळे सर व मानव वन्य जीव रक्षक बुलढाणा जिल्हा मनजीत सिंग शिख यांची उपस्थिती होती यावेळी संचालन प्रसेनजित मिश्रा यांनी केलेएर मार्गदर्शन पर भाषणात
प्राध्यापक आमले सर यांनी चिमणी या पक्षाचे पर्यावरणासाठी महत्त्व विशद केले तसेच मनजीत सिंग यांनी सालई या वृक्षाचे पर्यावरणातील महत्त्व स्पष्ट केले. आर एफ औ यांनी सर्व उपस्थितना आवाहन केले की सर्वांनी येत्या काळात पर्यावरणासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे गरजेचे असून त्यासाठी वनविभाग सुद्धा कटिबद्ध आहे. यावेळी पाण्याचे पात्र सर्व परिसरात बोपण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले व येणाम्या उष्णतेच्या काळात रोखण्यासाठी शपथ घेण्यात आली यावेळी उपस्थित होते चतुर्भुज केला, प्रसेनजित मिश्रा, शरद जाधव, भिमराव पाटिल, सुनील भगत, रघुनाथ कौलकार, डॉ. सतीश शिरेकार, आश्विन राजपूत, डॉ. आदित्य जापव, अवय वानखडे, दीपक जाधव, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व वन विभागाचे कर्मचारी पर्यावरण मित्र मंडळीने परिश्रम घेतले. ✍️



