बुलढाणामहाराष्ट्र

बुलढाणा येथे पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण चालू

बुलढाणा येथे पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण चालू प्रतिनिधी राजेंद्र मुंडे .

सक्षम बनवण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेत 18 प्रकारचे व्यवसाय समाविष्ट असून या योजनेची घोषणा 17 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आली होतीसदर योजनासाठी गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जात असून या योजनेच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा हा चालू झालेला आहे यामध्ये 5 ते 15 दिवसापर्यंतचे प्रशिक्षण देण्यात येते यामध्ये बुलढाणा येथे देशमुख मंगल कार्यालय या ठिकाणी निवड झालेल्या विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देणे चालू झालेले आहेयामध्ये शिंपी, सलून (ब्युटी पार्लर), बांधकाम व्यवसायाचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत असून सदर प्रशिक्षण हे एम्पॉवर प्रगती या संस्थेअंतर्गत घेण्यात येत आहेया ठिकाणी कंपनी हेड श्री अतुल पांडेजी महाराष्ट्रा हेड श्री अमोल कुलकर्णी आणी बुलढाणा सेंटर हेड श्री वैभव एकबोटे यांच्या मार्गदर्शना खाली कोमल अग्रवाल, सविता क्षीरसागर, प्रतिभा डोईफोडे, भागवत जाधव, निखिल शर्मा, अर्चना जाधव, रुचिरा पाटील या ट्रेनर अंतर्गत संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षणार्थ्यांना दररोज पाचशे रुपये तसेच प्रवास भाडे आणि जेवण सुद्धा देण्यात येत आहे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर सदर व्यवसायाचे सर्टिफिकेट आणी आय डी कार्ड देण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षणार्थ्यांना आपापल्या व्यवसायात साहित्य खरेदीसाठी 15000 रुपयांपर्यंत ई व्हाऊचर देण्यात येणार आहे तसेच संबंधित व्यवसायावर तीन लाखापर्यंतचे लोन देण्यात येणार आहे यामध्ये पहिला टप्पा एक लाखाचा असून दुसरा टप्पा हा दोन लाखाचा मिळणार आहे सदर कर्ज.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button