खानदेशजळगावा जिल्हारावेर

मानवतेला काळिमा! दिव्यांग व्यक्तीला विहिरीत १५ मिनिटे उलटे लटकवल्याचा आरोप

व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी यावल पोलिसांची कारवाई; दोन आरोपी अटकेत, एक फरार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जळगाव जिल्हा प्रतिनिधी : विनोद तायडे

यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथे एका ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

नेमकी घटना काय?

दहिगाव येथील पाटील गल्लीतील रहिवासी नामदेव रामदास पाटील (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास संशयितांनी त्यांना सोबत नेले.

त्यानंतर दहिगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील नावरा रस्त्यावरील विहिरीजवळ त्यांना नेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादीनुसार, नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील (वय २३) आणि पंकज उर्फ झग्या संतोष पाटील (वय २२) यांनी नामदेव पाटील यांना दोन्ही पायांनी धरून सुमारे १५ मिनिटे विहिरीत उलटे लटकवले. यावेळी त्यांना मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप

या घटनेचा तिसऱ्या व्यक्तीने मोबाईलवर व्हिडिओ तयार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दोन आरोपी अटकेत; एक फरार

नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील आणि पंकज उर्फ झग्या संतोष पाटील या दोन आरोपींना अटक केली आहे. तर या घटनेतील तिसरा आरोपी सध्या फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करत आहेत.

दरम्यान, दिव्यांग व्यक्तीला अशा प्रकारे त्रास दिल्याच्या आरोपामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button