जळगावा जिल्हाजळगावा जिल्हासंपादकीयसामाजिक
जागृत जनमंच,जळगाव शहरात बदल घडवण्यासाठी!

जळगाव शहरातील रस्ते मागील आठ वर्षांपासून बनवले नाहीत.निमित्त होते अमृत योजनेचे खोदकाम.पण आता ते आटोपले.रस्ते बनू लागले.पण यात मोठा भ्रष्टाचार चालू आहे.आमदार भोळे,सा.बां.अभियंता प्रशांत सोनवणे यांनी एकूण ४२कोटीत ३८रस्त्यांची एकच वर्क ऑर्डर एकाच मक्तेदाराला दिली.त्यात कोणता रस्ता,किती लांब,किती रूंद असा काहीच उल्लेख नाही.ते सर्वच लपवलेले आहे.ही चोरीची,अपहाराची, भ्रष्टाचाराची सुरूवात आहे.आमदार भोळे या पापाची जबाबदारी झटकतात.का?निधी आणण्याचे श्रेय घेतात तर तो प्रामाणिकपणे खर्च केला पाहिजे.तुम्ही निधी आणला ,तो काय तुमची शेती,घर ,बंगला विकून आणला नाही.तो आमच्याच करातून जमा झालेला पैसा आहे.हिशोब तर घेणारच.नाही दिला तर जेलमध्ये जाणारच.
जळगाव शहरातील गांधी मार्केट ते सुभाष चौक पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण साठी ६० फुटांचा मक्ता दिला आहे.आणि बनवला फक्त २० फूट.कोणी लक्ष देत नाहीत.नगरसेवक तोंडावर पांघरूण घेऊन झोपले आहेत.निवडणुक लागल्यावर बिळातून बाहेर पडतील.येथे ४०फुटाचा पैसा चोरण्याचा प्रयत्न झाला.एकही नगरसेवक आक्षेप घेत नाही.सर्व चोर एकमेकांचे मावसभाऊ.तो चोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला.आमच्या तक्रारी नंतर सात दिवसांनी मक्तेदारांनी आणखी २०फूट रस्ता बनवला.म्हणून गांधी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी जळगाव जागृत जनमंच चे आभार मानले.
जर जळगाव मधील नागरिक असेच सोबत राहिले तर जळगाव मधील राजकीय चोरांना आठाणा चोरू देणार नाही.
आम्ही जळगाव जागृत जनमंच मधे स्वेच्छेने,आंतरप्रेरणेने काम करणारी माणसे आहेत.आम्ही निधी जमवत नाही,देत ही नाही.आमच्या नैतिक बळावर आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे आमचे मिशन यशस्वी होत आहे.यापुढे जळगाव महापालिकेत कोणत्याही चोराला नगरसेवक निवडून देऊ नये.यासाठी नव्या दमाचे , प्रामाणिक लोकांनी सोबत यावे.नगरसेवक बनले तरीही आम्ही मक्तेदारी करू देणार नाही.कमीशन ,लांच घेऊ देणार नाही.अशी तयारी असलेल्या लोकांनी आमच्या सोबत यावे.आम्ही मतांचे पैसे वाटणार नाही. वाटू देणार नाहीत.अशाच उमेदवारांनी आमच्या सोबत यावे. दारू,मटण ,जेवण वगैरे देणार नाही.अशाच मतदारांनी आम्हाला साथ द्यावी.कारण मतदानातून भ्रष्टाचार, निवडणुकीतून भ्रष्टाचार सुरू झाला तर पुढे जास्त होतो.जो उमेदवार जास्त पैसा खर्च करतो, मतदारांना वाटतो तो नगरसेवक बनल्यानंतर चोरी करणारच.हे आता थांबवणे आहे.एकंदरीत आताचे नगरसेवक हे महानगरपालिका म्हणजे कमाईचे साधन समजतात.म्हणून पन्नास लाख पर्यंत खर्च करतात.असे भ्रष्ट प्रवृत्ती चे लोक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून जाऊ नयेत.असा आमचा प्रयत्न आहे.आमचे मिशन आहे.आवडले तर कळवा.सहभागी व्हा.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.



