महाराष्ट्र

घर बांधण्यास कारणावरून एका परिवारावर काठीने मारहाण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव । अतिक्रमीत जागेवर घर बांधण्यावरून वाद होवून युवकाने इसमास काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील आळसणा येथे घडली.याबाबत राजेंद्र नाना पहुरकर (५५) रा. आळसणा यांनी ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली की, ते अतिक्रमीत जागेवर राहत असून त्यांच्या घराच्या बाजूला घर बांधावयाचे आहे असे म्हणून गौतम भगत (२२) याने वाद घातला. व पहुरकर यांना काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या आईला देखील डोक्यावर मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गौतम भगत याच्याविरूध्द भादंवि कलम याच्याविरूध्द ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button