Uncategorized
घरासमोरून दुचाकी लंपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । फिर्यादी जगदीश प्रकाश घाटोळकर वय ३६ वर्षे, रा. मोदीनगर शेगाव यांनी दिलेल्या शहर पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी यांनी २१ नोव्हेंबर रोजी रात्री घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांची स्वतःची स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल घरासमोर उभी करून ठेवली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मोटारसायकल घरासमोर दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटारसायकल मिळून आली नाही. यावरून कोणीतरी त्यांची मोटारसायकल चोरून नेल्याबाबतची तक्रार त्यांनी शहर पो.स्टे.ला दिली.
तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोना निलेश गाडगे हे करित आहेत



