Uncategorized
घराचे कुलूप तोडून चोरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगावः येथील जमजम नगर मधील फिदाअली हसनअली हे पत्नी नसरीनसोबत मोहरमसाठी खामगाव येथे गेले होते. १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता खामगाव येथे गेलेले कुटुंब सायंकाळी ४ वाजता घरी परतले असता त्यांना त्यांचे घरी चोरी झाल्याचे आढळून आले.
भरदिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी घरातील आलमारीतील लॉकरमधून ५० हजार रूपये रोख चोरून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला असून घटनेचातपास पोहेकॉ गणेश वाकेकर हे करित आहेत.



