घराकडे जाण्यासाठी रस्ता द्यावी.जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – (शेतकरी पुत्र राम इढोळे व डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचा पाठींबा.)
राम इढोळे :-जिल्ह्यातील पेनबोरी येथील विलास विश्वनाथ आप्पा चवरे यांनी गेल्या ३ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
त्यांनी उपोषणामध्ये त्यांच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता होता.परंतु गावातील एका व्यक्तीने त्यांच्या घरासमोर मोठा खड्डा केला आहे.त्यामुळे त्यांना व त्यांच्या घरातील कुटुंबास घराकडे जाण्यासाठी रस्ता नाही.त्यामुळे त्यांच्या सर्व कुटुंबास फार त्रास सहन करावा लागत आहे.
म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.ते अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा आहेत.परंतु त्याच बरोबर त्यांना घराकडे जाण्यासाठी रस्ता पण असणे जरुरीचे आहे.
म्हणून या उपोषणाला शेतकरी पुत्र राम इढोळे व डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी संयुक्तपणे जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी उपोषणकर्ते विलास चवरे यांनी सांगितले की, ज्या जागेवर घर आहे.त्या घराचा ८,अ, देखील ग्रामपंचायत ने दिला आहे.परंतु ज्या व्यक्तीने घरासमोर मोठा खड्डा केला आहे त्या व्यक्तीला ग्रामपंचायत व सचिव पाठीशी घालत आहे.
एवढेच काय तर.ग्रामपंचायतने नोंद केली असून त्याची घर टॅक्स,व सर्व ग्रामपंचायत च्या कर भरत आहे.
म्हणून संबंधित विभागाने यांच्या उपोषणाची दखल घ्यावी.असे शेतकरी पुत्र राम इढोळे.व डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी त्यांच्या उपोषणाला दि.६ सप्टेंबर रोजी भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या समस्या रितसर आहेत.म्हणून विलास चवरे यांच्या आमरण उपोषणाला शेतकरी पुत्र राम इढोळे व डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी जाहीर पाठिंबा देवून त्यांच्या मागण्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू.असे सांगितले आहे.✍️



