क्राईमगुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तरुणीचे अस्सल फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी :- गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव येथे तरुणीचे अस्सल फोटो काढून ते व्हायरस करण्याची धमकी शरीर संबंधांसाठी दबाव टाकल्यास प्रकार
उघडकीस आला आहे, दररोज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीलाचा आरोप,
याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर नरहरी लिप्ते (४५) याच्याविरूद्ध विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करत होती. २५ डिसेंबर २०२०

रोजी सायंकाळी आरोपीने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अश्लील फोटो काढले. त्यानंतर धमकी देत तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे, तसेच आरोपीने पीडितेला हॉटेलच्या छतावर नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतरही आरोपीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेने शारीरिक संबंधास नकार दिल्यानंतर

आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याचेही समोर आले आहे. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर १२ मे २०२६ रोजी रात्री शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button