विधानसभा निवडणुकी मध्ये सोशल मीडियावर दावे करणारे पडले तोंडघशी !

मलकापूर विधानसभेची निवडणूक आजी माजी आमदारां च्या अस्तीत्वाची सिद्ध करण्यासाठी निवडणूक लढविली..या निवडणुकीचे बरेचशा लोकांनी बांधलेले अंदाज मात्र फोल ठरले. विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात सोशल मीडियावर निवडणुकी मध्ये आपलाच विजय असा विश्वास जणूकाही पताकाच फडकविण्याचे काम केले परंतु त्यांनी बांधलेले त्यांचे अंदाज हे चुकीचे ठरल्या बरोबर सट्टा बाजार मध्ये ही बांधण्यात आलेले अंदाज फोल ठरले कारण जसजसा निकाल येत होता तस तसा हा मताधिक्क्याची टक्केवारीचा वाढत होता व हा आकडा २६ हजाराच्यावर जाऊन भाजपाच्या बाजूने गेल्याने. तसेच हवेत असलेल्यांच्या हवाच निघून गेली तेव्हा बरेचशांचे चेहरे पाहण्यालायक होते आणि काही छुपे दावे करणारे ही तोंडघशी पडल्याची चर्चा मतदार संघा मध्ये मागील आठवड्या पासून चर्चिल्या जात आहे. मलकापूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही यावेळी अत्यंत चुरशीची व सरळ-सरळ अशी होती. आजी माजी आमदारांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनविले होती. तर माजी आमदार राजेश एकडे यांनी पाच वर्षा मध्ये अंदाजे ३ हजार कोटीच्या आसपास विकासात्मक कामे केल्याचा मुद्दा निवडणुकी मध्ये मतदारांसमोर ठेवला. आणि आमदार विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांनी मागील २५ वर्षाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडून तसेच आगामी काळात
मतदारसंघाचा विकास करण्याची वचनपुर्ती दिली. तसेच यावेळी महाविकास आघाडी व महायुती कडून दोन्ही ऊमेदवार हे समोरासमोर असल्याने व इतर १३ उमेदवार हे पाहिजे तसे मताधिक्य मिळवू शकले नाही. ते १३ मिळून…. एवढ्या मतापर्यंतच पोहचले आणि या निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये तब्बल हजाराच्यावर मताधिक्य घेवून मलकापुर मतदार संघात परत भाजपाचे कमळ फुलले. २० ते२५ दिवसाच्या कार्यकाळात शांततेत सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र सोशल मीडियाने चांगलाच रंग भरला. होता तसेच सोशल मीडियावर व्हायरल फोटो, रिल्स अन् एकमेकांच्या प्रचारा मध्ये कमेंट ही अनेकदा वादाची ठिणगी पाडू शकली असती. परंतु सोशल मीडियाचा प्रचार करतांना आपला उमेदवार किती सरस आहे हे तेवढ्याच ताकदीने व्हायरल करण्यात आले. हे करत असतांना
ईव्हीएम मशिन, व धनशक्तीचा मतदारांवर झालेला प्रभाव, तसेच लाडक्या बहिणींची साथ, हिंदुत्वाचे एकत्रिकरण, धर्मयुध्दाची दिलेली हाक याचा प्रभाव निवडणुकी चा निकाल लागल्यानंतर विरोधकांकडून बोलले जात आहे. परंतु मतदार संघातील ग्रामीण भाग असो वा शहरी भाग या भागामध्ये विरोधकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा असलेला प्रभाव हा दिसून न आल्यानेच त्यांच्या भागा मध्ये कमळ फुलल्याचे चित्र दिसून आले. परंतु त्यांनी या सर्व बाबींचा विचार करून त्यांच्या उमेदवाराला मताधिक्य नव्हेतर बरोबरीपर्यंत तरी नेणे अपेक्षित होते, परंतु तसे न झाल्याने त्यांच्या भागा मध्ये कमळच फुलले. ही तेवढीच चिंतनीय बाब असल्यामुळे विरोधकांना आत्मचिंतन करण्याचीही तेवढीच आवश्यकता असल्याचेही मतदार संघात बोलले जात आहे. आणि विजय आपलाच
असा दावाही दोन्ही बाजूने झाला. परंतु निकालाच्या दिवशी मतमोजणी च्या वेळी ईव्हीएम मशीनमधून बाहेर पडणारी मतांची आकडेवारी ही विजयाचे दावे करणाऱ्यांना तोंडात बोटे घालण्याला लावणारी अशीच ठरली. परंतु सोशल मीडियावर बऱ्याचशांनी विजय आपलाच असा दावा करतांना जणू विजयावर शिक्कामोर्तबच करीत केवळ फटाके फोडण्याचेच बाकी की कायअशीच तयारीही दाखविली. परंतु मतमोजणी झाल्या नंतर भाजपाच्या बाजूने मतदारांनी दिलेला कौल हा फटाके फोडण्याची इच्छा असलेल्याचे ही फटाके फुसके निघाल्या सारखे ठरले. त्यामुळे लागलेला हा निकाल सोशल मीडियावर बऱ्याचश्या लोकांनी केलेले छुपे दावे हे त्यांना तोंडघशी पाडल्या सारखी झाल्याची चर्चा गेल्या सहा दिवसांपासून मलकापूर मतदार संघात सोशल मीडियावर आणि मतदार संघातील चौकाचौकात चांगलीच रंगत आहे.



