दख्खणी मराठा समाजाच्या वतीने…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी (व्ही.एम.घोडे)
तेल्हारा दि9. तेल्हारा शहरामध्ये दख्खनी मराठा समाजाच्या वतीने एक थाप शाब्बासकी ची देऊन उत्तीर्ण झालेल्या दख्खणी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.व हा सत्कार समाजातील व्यक्तींच्या हस्ते व्हावा या हेतूने दि.9 जुलै 2023 रविवार रोजी ग्लोबल कम्प्युटर तेल्हारा येथे कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर गर्जे हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये प्रभाकर मोरे,अर्जुन कदम, नारायण शेळके ,साहेबराव सोनवणे ,उमेश शिंदे,हे होते .
इयत्ता दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांची नावे पुढील प्रमाणे – शंतनु राजेश पवार ,कु.धनश्री राजेंद्र मुळे,जय रवींद्र गावडे, गोपाल नितेश मोरे ,मयूर मोहन पवार ,आदित्य गणेश पवार ,ओम संतोष मोरे ,सानिका अरुण कवळे ,मयुरी योगेश सरोदे, गणेश वसंत पवार , या विद्यार्थ्यांचा सत्कार वरील नमुद मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जय रवींद्र गावडे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.
दख्खणी मराठा समाजाच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येत असतो यावर्षी ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने प्रमुखांच्या उपस्थितीत आनंदाने पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्लोबल कम्प्युटरचे संस्थापक अनंत साहेबराव सोनमाळे यांनी केले तर दिनेश भाऊ शेळके यांचे उत्तम सहकार्य लाभले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजातील समाज बांधव व भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रकांत दादा मोरे यांनी समाजातील उपस्थित मान्यवरांचे आभार मानले



