Uncategorized

‘गुवाहाटी’च्या सौदेबाजीचे बिंग फुटले!

खोक्यांवरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद पेटला

कडू यांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

शिंदे-फडणवीस यांनाही नोटीस पाठवणार

अमरावती, दि. २३ (प्रतिनिधी) खोके सरकारसोबत असलेले अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात खोक्यांवरूनच जोरदार वाद पेटला असून कडू यांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार देऊन रवी राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

‘बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार आहे. खोके मिळाल्यानंतरच तो गुवाहाटीला गेला होता,’ असा सनसनाटी आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर मिंधे सरकारसोबत असलेल्या या दोन्ही आमदारांमधील वाद विकोपाला गेला आहे.. कडू यांनी अमरावतीतील

खोके आणि ओके हाच पक्ष ! ‘मंत्रीपद सोडून असंच कुणी दुसरीकडे जातं का? बच्चू कडू गुवाहाटीला का गेला? याला कोणता पक्ष आहे? याचा पक्ष एकच ‘खोके आणि ओके.’ खोके घेतल्याशिवाय याचे पानही हलत नाही. हा खोके घेऊनच गुवाहाटीला गेला होता,’ असा आरोप रवी राणा यांनी केला होता. ‘बच्चू कडू नौटंकीबाज आहे. या टीनपाटाने गुवाहाटीला जाऊन आणि सत्ताधाऱ्यांची लाळचाटेगिरी करून जी संपत्ती जमा केलीय ती आधी गरीबांना वाटून दाखवावी’ असे आव्हानही राणा यांनी दिले होते. त्यावरून हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.

खोके आणि गुवाहाटी वरून दोन आमदारांमधील वाद टोकाला ; पोलिसात तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण, जाणून घ्या

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button