बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गिरोली गावा मध्ये निकृष्ट दर्जाचे काम; लाखो रुपयांच्या रस्त्याची आणि नालीची ‘पोलखोल’

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ; शंकर शिवरकर

देऊळगाव राजा तालुक्यातील,गिरोली गाव हे गुगळादेवीच्या नावानं ओळखले जाते,स्थानिक प्रशासन,ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे गिरोली येथे होत असलेले रोड व नाली चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेली ही नाली आणि रस्ता पहिल्याच पावसात किंवा काही दिवसांतच उखडून जात असून, ठेकेदाराच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा रस्ता प्रामुख्याने तीर्थक्षेत्र गुळदेवी मंदिराला ,जुळतो या मंदिरात नेहमी हजारो भावी भक्त दर्शनासाठी पर्यटनासाठी येत असतात त्या अनुषंगाने त्यांना खराब रस्ता व धुळीचा गड्ड्याचा मोठा सामना करावा लागतो.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या आणि नालीच्या बांधकामामध्ये सिमेंट आणि वाळूचे प्रमाण अत्यंत कमी आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असून, नियमानुसार काम न करता फक्त वरवर मलमपट्टी केली जात आहे.
स्थानिकांनी आरोप केला आहे की, या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून ठेकेदार आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचे संगनमत आहे. तक्रार करूनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
या कामासाठी अंदाजे 1 कोटी खर्च/रक्कम रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, भ्रष्ट कारभारामुळे हा सर्वसामान्य जनतेच्या कराचा पैसा पाण्यात जात आहे.स्थानिक नागरिक “हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. निकृष्ट साहित्यामुळे काही दिवसांतच नालीचे दगड निखळू लागले आहेत. संबंधित विभागाने याची चौकशी करावी.”गिरोली येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात प्रचंड अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.संबंधित कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्त्याची कामे केली जात असल्याने, नव्याने बनवलेला रस्ता काही दिवसांतच उखडू लागला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग यांना इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिलेला इशारा. दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा किंवा रास्ता रोको करण्याचा इशारा .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button