वंचित बहुजन आघाडीची 5 वी यादी जाहीर.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – वंचित बहुजन आघाडीची 5वी यादी जाहीर; अजित पवारांविरोधात ‘हा’ उमेदवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत 16 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदारसंघात देखील उमेदवार देण्यात आला आहे. तर वाशीम जिल्ह्यातील ३३ रिसोड – मालेगाव या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्रशांत सुधीर गोळे यांना वंचित ने तिकीट दिले आहे. या पूर्वी ते राष्ट्रवादी अजीत पवार गटाच्या युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडी उमेदवारांची पाचवी यादीत जाहीर केलेले उमेदवार व त्यांचे मतदार संघ पुढीलप्रमाणे,
1) भुसावळ – जगन देवराम सोनवणे
2) मेहकर- डॉ. ऋतुजा चव्हाण
3) मूर्तीजापूर- सुगत वाघमारे
4) रिसोड – प्रशांत सुधीर गोळे
5) ओवळा माजिवडा – लोभसिंग राठोड
6) ऐरोली – विक्रांत चिकणे
7) जोगेश्वरी पूर्व – परमेश्वर रणशुर
8) दिंडोशी -राजेंद्र ससाणे
9) मालाड – अजय रोकडे
10) अंधेरी पूर्व – ॲड. संजीवकुमार कलकोरी
11) घाटकोपर पश्चिम – सागर गवई
12) घाटकोपर पूर्व- सुनीता गायकवाड
13) चेंबूर- आनंद जाधव
14) बारामती- मंगलदास निकाळजे
15) श्रीगोंदा- अण्णासाहेब शेलार
16) उदगीर- डॉ. शिवाजीराव देवनाळे.
या यादीत उमेदवारांच्या जातीच्या उल्लेख केला आहे.



