Uncategorized

गरम पाणी अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीर जखमी होऊन  २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता समोर  जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैभव अनिल पाटील (वय २२, रा. आव्हाने, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात वैभव पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. १९ नोव्हेंबर रोजी वैभव पाटील हा घरी एकटाच असताना त्याच्या अंगावर गरम पाणी पडले होते. त्यानंतर तो घराबाहेर ओरडत आला होता.

दरम्यान त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव तालुका पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button