Uncategorized

गणेश खंदारे यांची भारतीय सैन्यात निवड

सोमठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : तालुक्यातील सोमठाणा या ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातून आलेल्या गणेश मोतीराम खंदारे या तरुणाची इंडियन आर्मी मध्ये निवड झाली आहे. या निवडीबद्दल गणेश मोतीराम खंदारे यांचा ग्राम सोमठाणा येथे गावकऱ्यांनी गुलाल उधळून गणेश खंदारे यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत केले. ग्रामीण भागातील तरुणही प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात. ही बाब मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथील शेतकरी कुटुंबातील घरी शिक्षणाची लहानपणापासून गोडी निर्माण करून आपण काहीतरी मोठे अधिकारी व्हावे असे गणेश खंदारे यांच्या मनात घर करून बसले होते त्यामुळेच मेहनत जिद्द चिकाटी आणि परिश्रम घेऊन गणेशने हे यश संपादन केले. त्यामुळेच गणेश मोतीराम खंदारे यांनी इंडियन आर्मी मध्ये निवड झाली आहे. ग्रामीण भागातील युवकही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रचंड मेहनतीने अभ्यास करून अपेक्षीत यश मिळवू शकतात. त्यामुळे गणेश खंदारे यांच्या सारखे युवक हे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असतात. ही बाब हेरून शेतकरी पुत्र गणेश खंदारे यांचा गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत व सत्कार करून संपूर्ण पंचक्रोशीत गणेश खंदारे याचं कौतुक होत आहे. दरम्यान, यावेळी सैनिक गणेश खंदारे याने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना मला लहानपणापासून व्यायामाची व खेळाची त्यासोबतच अभ्यासाची गोडी होती. शिवाय बालपणापासूनच देशसेवेत जाण्याचे स्वप्न होते. अभ्यासातील सातत्य व चिकाटीने केलेल्या परिश्रमामुळे ही संधी आज मिळू शकल्याची भावना व्यक्त केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button