खामगाव तालुक्यातील जनूना येथे विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा

खामगाव प्रतिनिधी रोकडे
जनुना तालुका खामगाव येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन अर्थातच भारतीय राज्यघटने च्या दिवशी विविध उपक्रमाचे आयोजन सरपंच अस्मिता ताई गव्हांदे, तसेच शाळा सुदर समिती अध्यक्ष संदीप सुळोकर , तथा उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आयोजन केले होते.
सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ध्वजारोहण सरपंच सौ . अस्मिता ताई गवांदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित तलाठी श्री गणेश ठोसरे साहेब तसेच ग्रामसेवक जंजाळ मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश हरमकार
माजी सरपंच सौ. सुवर्णाताई गोरे, व गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत वरून लगेच गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व जिल्हा प शाळे त ध्वजारोहण कार्यक्रम आटपून करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये गावातील वर्ग एक ते आठ या विद्यार्थी विद्यार्थिनींनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन विविध प्रकारचे विविध कार्यक्रम सादर केले या कार्यक्रममाचेआभार प्रदर्शन गावंडे सर यांनी केले…..✒️



