खामगावात सुरज मेसरे यांचा भव्य सत्कार; ओबीसी युवा चळवळीला बळकटी देण्याचा निर्धार

खामगाव | प्रतिनिधी (जी. डी. रोकडे)
राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी मलकापूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सुरज (भाऊ) मेसरे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश बेलोकार यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीनिमित्त बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने खामगाव येथील पत्रकार भवनात सुरज मेसरे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन करत पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विजय भाऊ डवंगे, शरद भाऊ वसतकार, गणेश भाऊ चौकसे, राजू अंबुसकर, रत्नाकर शिंगाडे, अरविंद शिंगाडे, तहसीन शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी सुरज मेसरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे संघटन बुलढाणा जिल्ह्यात अधिक सक्षम होईल, तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.



