अपघातजळगावा जिल्हामहाराष्ट्र

जागृत देवस्थान श्री कालिंकादेवी मंदीर खामगांव येथे नवरात्री निमीत्य सामुहिक महाआरती

शेकडो भक्तांनी घेतला महाआरतीचा लाभ

स्टार‌ भारत लाईव‌ एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

जागृत देवस्थान श्री कालिंकादेवी मंदीर खामगांव येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्रोत्सवात हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. दरवर्षी नवरात्रोत्सवानिमीत्य विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील सामुहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील शेकडो महिलांसह भाविक भक्तांनी या महाआरतीचा लाभ घेतला.

दरवर्षी श्री कालिंकादेवी मंदीर येथे नवरात्रोत्सवानिमीत्य विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. खामगांव शहरातील सर्वांत उंच अशा टेकडीवर वसलेले हे मंदीर अत्यंत उत्साहवर्धन वातावरण निमार्ण करते. जगत जननी समजल्या जाणाऱ्या आई कालिंका मातेच्या मदीरात परीसरातील नागरीक मोठया भक्तीभावाने दर्शनासाठी येतात. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी याठिकाणी सामुहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री कालिंकादेवीची आरती करण्यासाठी खामगांव शहरातून व परिसरातून मोठयासंख्येत महीलांसह भाविक भक्तांनी गर्दी केली होती. संपुर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते. महिलांनी हिरवी साडी नेसुन पारंपारीक वेशभुषेत आई कालिंकादेवीची महाआरती केली यावेळी 9 आरत्या करण्यात आल्या . या कार्यक्रमांना शहरातील व परिसरातील भाविक भक्त मोठया संख्येने सहभागी होऊन आई कालिंकादेवीचे आशिर्वाद घेतात. श्री कालिंकादेवी मंदीर येथे वर्षभर मंगळवारी आरतीचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी कालिंका पुराणाचे वाचन होते, तसेच दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करण्यात येतात. गरबाचे देखील आयोजन कालिंकादेवी सभागृहात करण्यात येते. या सर्व कार्यक्रमांमध्ये महिला भगिणींचा मोठया प्रमाणात सहभाग असतो.
वसंत पंचमीला आई कालिंकादेवी वर्धापन दिन असल्यामुळे येथे भव्यस्वरुपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आई कालिंकादेवीची पालखीतून दिंडी काढून संपुर्ण परिसरातून ही मिरवणुक जाते. भाविक भक्त आपआपल्या घरासमोर सडा टाकून रांगोळी काढून, फटाक्यांची आतीषबाजी करुन आई कालिंकादेवीचे मनोभावे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतात. हा संपुर्ण परिसर भक्तीमय वातावरणात बुडून जातो.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button