निधनविदर्भ

दु खद वार्ता

.

दु खद वार्ता
स्टार भारत लाइव एक्सप्रेस

बुलडाणा जिल्हा ग्रामीण

प्रतिनिधि ऋषिकेश देठे

लोकप्रिय तथा अपराजित आमदार मा.श्री.गोवर्धन जी उपाख्य लालाजी शर्मा यांच्या दुःखद निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायक आहे. स्व.गोवर्धन शर्माजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अतिशय मनमिळावू आणि सर्वांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणारा एक सच्चा व लढविय्या नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या सहवासाच्या अनेक आठवणी येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते आमदार असा त्यांचा विलक्षण असा प्रवास आहे. पश्चिम विदर्भात भाजपा रुजविण्यात व वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. स्व. प्रमोद जी महाजन, स्व. गोपीनाथ जी मुंडे, स्व.भाऊसाहेब फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतरावजी देशमुख, मा.खा.श्री. संजयजी धोत्रे यांचे सहकारी होते आणि त्यांच्या बरोबरीने त्यांनी भाजपा वाढविण्याचे काम केले. ते अतिशय लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. प्रभू रामचंद्रांची भव्य मिरवणूक त्यांच्याच नेतृत्वात व कल्पनेतून आजही अकोला शहरात भव्य दिव्यतेने निघते. अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. राजकीय क्षेत्रात सक्रिय काम करीत असतांना सुद्धा ब्राह्मण समाजाला एकत्र आणून बहुभाषिक ब्राह्मण महासंघाची सुरुवात त्यांनी केली. स्व. गोवर्धन जी शर्मा यांच्या जाण्याने सामाजिक व राजकीय क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. स्व. गोवर्धन शर्माजी यांच्या आत्म्याला सद्गती मिळो, या दुःखातून सावरण्याची शर्मा कुटुंबीयांना शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या परिवाराच्या व असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी व फुंडकर कुटुंबीय सहभागी आहे.
ओम ॐ शांती 🙏🏻🙏🏻🙏🏻
आ आकाश फुंडकर
आमदार खामगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button