खानदेशजळगावा जिल्हा

केजरीवालांना अटक:- जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे जाहीर निषेध

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री.अरविंद केजरीवाल यांना काल रात्री ED कडून अटक करण्यात आली असून याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीने अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व तहसीलदार साहेब यांना सदर निवेदन देण्यात आले. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले की भाजपाच्या इशारावर चालणाऱ्या ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाचे पालन न करता सूडबुद्धीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली कालचा दिवस हा लोकशाहीचा काळा दिवस म्हणता येईल एकीकडे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना संपूर्ण देशात आचारसंहिता लागू असताना आम आदमी पार्टीने या निवडणुकीत भाग घेऊ नये या हेतूने इडी चा वापर करून आम आदमी पार्टीला रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले आम आदमी पार्टी रोखण्यासाठी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा सपाटा भाजपा सरकारने चालवलेला आहे आशा कारवायामुळे देशांमध्ये लोकशाही व संविधान जिवंत राहणार नाही ईडी. सीबीआय कोर्ट. सीआयडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट.भाजपा सरकार यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवत आहे ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याच जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी म्हटले आहे.या निषेध आंदोलनात. युवा आघाडीच्या राज्य कार्यकारणी सदस्य चंचल सोनवणे.जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार सर.संघटन मंत्री नामदेव पाटील.अमळनेरचे तालुकाध्यक्ष स्वप्नील नवल पाटील.जळगाव शहराचे माजी महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर.जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख योगेश भोई.ओम प्रकाश अग्रवाल.नारायण पितांबर पाटील तालुका उपाध्यक्ष.राजेंद्र भाऊराव पाटील तालुका संघटक.रामकृष्ण देवरे तालुका सचिव.योगेश पाटील.डॉ रुपेश संचेती.रियाज बागवान.सलीम भाई डॉ.महेंद्र साळुंखे.देविदास पाटील.दुर्गेश पवार.उमाकांत ठाकूर.नंदू जगन्नाथ पाटील.प्रतिभा पाटील.को.को.कोला सर.प्रभाकर पाटील.आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button