महाराष्ट्र

कृषी पर्यवेक्षक याने 4 हजारा ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात….


जी .डी.रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी..
बुलढाणा.. शेतकरी आपल्या शेतात कबाड कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा हाकणारा, आणि देशाचा पोशिंदा म्हटल्या जाणारा, शेतकरी संकटाच्या कचाट्यात नियमित सापडतो. त्यातच लाजखोर अधिकारी कर्मचारीही काम अडकले तर आर्थिक लुबाड नुक करतात .मात्र एका बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने मलकापूर तालुका कृषी कार्यालयातील एका भ्रष्ट खोर कृषी पर्यवेक्षकास चांगली अद्दल घडली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 9 फेब्रुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मलकापूर ते बोदवड मार्गावरील पिंपळगाव देवी फाट्यावर चार हजाराची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक ईश्वर सावकारे यास रंगेहात पकडले. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या पूर्वसंमतीने तक्रार करता शेतकऱ्यांचे मळणी यंत्र खरेदी केले होते . यंत्राच्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केल्याचा मोबदला म्हणून कृषी पर्यवेक्षक सावकारे याने 5 हजार रुपयाची लाच मागितली हक्काचे पैसे गुन्हेगारास देणे मान्य नसल्याने शेतकऱ्याने एसीबी कडे तक्रार केली दरम्यान 6 फेब्रुवारीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली झालेल्या चर्चेनंतर सावकारे याने तड जोडी अंती चार हजार रुपये स्वीकारण्यात संमती दिली. त्यानुसार 9 फेब्रुवारीला मलकापूर ते बोदवड मार्गावर पिंपळगाव देवी फाट्यावर राधास्वामी सत्संग जवळ सापळा रचण्यात आला. यावेळी पंचा समक्ष चार हजार रुपये स्वीकारताना सावकारे याला अटक करण्यात आली .पोलीस निरीक्षक रमेश पवार विलास गु सिंगे, लक्ष्मीकांत इंगळे गजानन गारडे ,रंजीत व्यवहारे ,शैलेश सोनवणे ,नितीश शेटे ,यांच्या पथकाने हा ट्रॅप यशस्वी केला….✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button