गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हाराच्या फुटबॉल संघाची जिल्हास्तरावर निवड

गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हाराच्या फुटबॉल संघाची जिल्हास्तरावर निवड
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी-व्हि.एम.घोडे
तेल्हारा दि १.तेल्हारा क्रीडा संकुल येथे गुरूवार दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला व तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा मधील विद्यार्थ्यांचा फुटबॉल संघ विजयी झाला.
या स्पर्धेचे उद्घाटन तेल्हारा क्रीडा संयोजक श्री शांतीकुमार सावरकर यांच्या हस्ते झाले. गुरुकुल ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. या संघामध्ये असलेले विद्यार्थी क्रिश रत्नपारखी,अपूर्व गोपनारायण ,सोहम दही ,हर्ष टाले ,वेदांत देशमुख ,अभय बलोदे ,कृष्णा अकोटकार ,आर्यन धरमकार ,पार्थ टावरी ,पार्थ खोट्टे ,यथार्थ दायमा ,पुष्पक डोंगरे ,शोन गेबड, आदित्य चितलांगे ,अनमोल खोटरे ,आदि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हाराचे अध्यक्ष श्री कमलभाऊ चांडक (माहेश्वरी) सौ अर्चना माहेश्वरी मॅडम, ज्ञानपीठ चे प्राचार्य श्री देठे सर, मुख्याध्यापिका सौ पारसकर मॅडम आणि सहाय्यक शिक्षिका सौ पालीवाल मॅडम सौ देठे मॅडम कुमारी तापडिया मॅडम सौ महल्ले मॅडम सौ तेल्हारकर मॅडम श्री भुजबले सर श्री दातकर सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या विद्यार्थ्यांना गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा चे क्रीडाशिक्षक जावेद शहा सर यांचे योग्य प्रशिक्षण लाभल्यामुळेच या विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त होऊ शकले असे म्हणणे वावगं ठरणार नाही म्हणून गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा चा फुटबॉल संघ विजयी ठरला व या संघाची निवड जिल्हास्तरावर झाली




