वाशिम जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या हवदौसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या*

*वाशिम जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या हवदौसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या*
*स्वराज्य संघटना वाशिम यांच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी वाशिम यांना निवेदन* *वाशिम जिल्हा प्रतिनिधी* *अजय गायकवाड* वाशिम – : शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पूर्ण वन्यप्राण्यांमुळे बेचिराक झाला आहे, त्या प्रामुख्याने रोही,रानडुक्कर,हरिण इत्यादी वन्यप्राणी पिकाचे अतोनात नुकसान करीत असून त्यांना पायबंद घालण्यासाठी योग्य त्या उपयोजना कराव्या, प्राण्यांच्या नासाडीमुळे पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये देण्यात यावी, शासनाने शेतकऱ्यांच्या सरसकट 80% टक्के अनुदान देऊन शेतकऱ्यांना तार कुंपण साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून सरसकट सन्मान निधी उपलब्ध करून द्यावा, संबंधित विभागाने 15 ऑगस्ट पर्यंत योग्य ती कारवाई न केल्यास स्वराज्य संघटना वाशिम यांच्या सह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वराज्य संघटनेचे जिल्हा संयोजक उद्धवराव ढेकळे, शिवश्री अरविंद पाटील, स्वप्निल वाघ, गोपाल भिसडे स्वराज्य राज्य सदस्य , ओम वाघ पाटील, संदेश शिंदे, जयजयराम कापसे आदी उपस्थित होते.



